Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेक्स रॅकेट: तेलगू अभिनेत्रीचा पोलिसांनी केला भांडाफोड

सेक्स रॅकेट: तेलगू अभिनेत्रीचा पोलिसांनी केला भांडाफोड
हैदराबाद , मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (15:12 IST)
हैदराबादच्या पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. त्यात एका तेलुगू अभिनेत्रीसह एका दलालाला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. अटक करण्‍यात आलेल्या दलाल हा टॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. 

टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त एन. कोटी रेड्डी यांनी दिलेली माहिती अशी की, बंजारा हिल्समध्ये एका हॉटेलमध्ये सापळा रचून अभिनेत्री आणि आयोजक बालूला रंगेहाथ अटक केले. दोन्ही सेक्स रॅकेटमध्ये सहभागी आहेत. टास्क फोर्सच्या (पश्चिम क्षेत्र) चमुने ही कारवाई केली.

टॉलिवूडमध्ये काही काळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणार्‍या बालूनं पोलिसांच्या खोट्या ग्राहकांमधील एका सदस्याकडून अभिनेत्रीतर्फे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. आरोपी अभिनेत्रीला महिला सुधार गृहात पाठवण्यात आले असून बालूला पोलिस कोठडी सुनावण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi