Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनमपेक्षा ऐश्वर्यासोबत छान दिसत होतो

सोनमपेक्षा ऐश्वर्यासोबत छान दिसत होतो
‘प्रेम रतन धन पायो’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान सलमाननं या सिनेमाच्या पोस्टरची तुलना ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाच्या पोस्टरसोबत केलीय.. आणि महत्त्वाचं म्हणजे, ‘हम दिल दे चुके सनम’चं पोस्टर त्याला प्रेम रतन धन पायोहून जास्त आवडतंय. 
 
या दोन सिनेमांच्या पोस्टरमध्ये तुला काही साम्य आढळतंय? असं जेव्हा सलमानला पत्रकारांनी म्हटलं.. तेव्हा थोडा वेळ पोज घेत ‘हम दिल दे चुके सनम’चं पोस्टर खूप चांगलं होतं.. आणि ‘हेही (प्रेम रतन धन पायो) खूप सुंदर आहे.. प्रीटी..’ असं दबंग खाननं म्हटलंय. नुकतंच सलमान आणि सोनम कपूर यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं.

याच पोस्टरची तुलना संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’सोबत करण्यात येतेय. या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi