Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोहाचे फेसबुकवर आगमन

सोहाचे फेसबुकवर आगमन
, सोमवार, 27 एप्रिल 2015 (12:41 IST)
सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने बॉलीवूडचे विश्वदेखील व्यापून टाकले. अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, दीपिका पादूकोण, प्रियांका चोप्रा सारख्या अनेक बड्या कलाकरांबरोबर इतर छोट्या कलाकारांचेदेखील सोशल मीडियावर अस्तित्व आहे.

सोशल मीडियावरील या गोतावळ्यात फेसबुक या सामाजमाध्यमावर अभिनेत्री सोहा अली खानने आपले प्रोफाइल तयार केले असून त्यावर तसा संदेश तिने प्रसिद्ध केला आहे. आपला प्रोफाइल फोटो अपडेट करण्याबरोबरच लग्नाच्या छायाचित्रांसह अन्य काही पोस्ट तिने फेसबुकवर प्रसिद्ध केल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi