Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्नॅपडीलचा आमीरला धक्का, कराराचे नूतनीकरण नाही

स्नॅपडीलचा आमीरला धक्का, कराराचे नूतनीकरण नाही
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (16:38 IST)
नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपनी ‘स्नॅपडील‘ चा ब्रॅंड एम्बेसेडर म्हणून अभिनेता आमीर खानच्या कराराची मुदत संपत आली असून या कराराचे नूतनीकरण होणार नसल्याची बातमी आहे. 
 
एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की आमीरसोबत एका वर्षाचा करार संपुष्टात येत आहे. हा करार आणखी एका वर्षाने वाढविण्याची तरतूद होती; मात्र आता कंपनीने करार न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर देश सोडून जाण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आमीरवर प्रचंड टीकाही झाली होती. अनेक लोकांनी ‘स्नॅपडील‘चे ऍप्लिकेशनही मोबाइलमधून काढून टाकले होते. याचा फटका बसल्याने ‘स्नॅपडील‘ने आमीरला जाहिरातीत दाखविणे बंद केले होते आणि आता कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi