Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वच्छ भारतच्या नव्या व्हिडिओत अमिताभ, सचिन

स्वच्छ भारतच्या नव्या व्हिडिओत अमिताभ, सचिन
नवी दिल्ली- स्वच्छ भारतच्या नव्या व्हिडिओत बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर शौचालय वापरण्यावर जोर देताना दिसतील. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हा व्हिडिओ जाहीर केला.
तोमर यांनी बच्चन आणि तेंडुलकरची प्रशंसा केली आणि म्हटले की दोघेही आपल्या कामाप्रती अत्यधिक समर्पित आहे.
 
मंत्री म्हणाले 'स्वच्छतेच्या प्रसार दिशेत आपला हातभार लावण्यासाठी हे लोकं नेहमी पुढे असतात. सचिनने अलीकडेच कार्यक्रमात आपली उपस्थिती दिली असून अमिताभजी देखील नेहमी तयार असतात.
 
ऑनलाईन माध्यमांव्यतिरिक्त हा व्हिडिओ टीव्हीवरदेखील प्रसारित करण्यात येईल. याचा अनुवाद इतर क्षेत्रीय भाषांमध्येदेखील करण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वस्तातली भटकंती