Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करते श्रुती हासन

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करते श्रुती हासन
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अभिनेत्री श्रुती हासन योगा करते आणि जिममध्ये जाते. पण त्यासोबत ती डांस देखील करते.  
 
फिट राहण्यासाठी काय करते असा प्रश्न विचारल्यानंतर श्रुतीने सांगितले, 'मी डांस करते आणि तोच माझा व्यायाम असतो. तसेच मी योगा  करण्याचा देखील प्रयत्न करीत आहे, कारण मला अस वाटते की योगा शरीर आणि मन दोघांसाठी फायदेशीर आहे.  
 
फॅशनबद्दल श्रुतीने म्हटले की, 'मला अस वाटत आहे की स्टाइल ही व्यक्तिगत बाब आहे. मी दुसर्‍यांची स्टाइल न घेता स्वत:ला जे आरामदायक वाटत ते घालते. मला सामान्य कपडे पसंत आहे, पण पिवळा रंग मला अजिबात आवडत नाही.'
 
श्रुतीचे येणारे चित्रपट 'रॉकी हैंडसम', 'यारा', 'पुली', 'वेदालम' आणि 'सिंघम 3' आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi