Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हाउसफुल-3मध्ये असणार जॅकलीन

हाउसफुल-3मध्ये असणार जॅकलीन
, बुधवार, 16 एप्रिल 2014 (15:31 IST)
‘हाउसफुल’ फ्रँचायझीच्या तिसर्‍या चित्रपटात जॅकलीन फर्नाडिसचा सहभाग असण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तिचा माजी प्रियकर साजिद खानऐवजी साजिद-फरहाद जोडीकडे देण्यात आली असून निर्मिती साजिद नाडियादवालाची आहे. कलावंतांच्या यादीत अक्षय कुमार आणि रितेश देशमुख तर आहेतच, पण त्याशिवाय अभिषेक बच्चनदेखील या चित्रपटात काम करणार आहे. ‘हाउसफुल-3’ मध्ये काम करण्यासाठी जॅकलीनशी संपर्क साधण्यात आला आहे. चित्रपटाच्या तारखा आणि इतर समस्या उद्भवल्या नाही तर ती हा चित्रपट करू शकते. हाउसफुल-2 जॅकलीनचा माजी प्रियकर साजिद खानने दिग्दर्शित केला होता. याच चित्रपटादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि लगेच ब्रेकअपदेखील झाला. साजिद-फरहाद या दिग्दर्शक जोडीचा हा दुसरा चित्रपट असेल. त्यांचा ‘इट्स एंटरटेनमेंट’ हा पहिला चित्रपट असून त्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अक्षयची प्रमुख भूमिका आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi