हृतिकशी पंगा पडणार महागात?

सध्या बॉलिवूडमध्ये कंगना राणावत आणि ह्रतिक रोशन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. आपले ह्रतिकसोबत संबंध होते, अशा प्रकारचे सूचित वक्तव्य कंगनाने केल्यानंतर ह्रतिक मात्र भडकला आहे.
 
कंगनाला ह्रतिकसोबत पंगा घेतल्यामुळे तिच्या करियरमध्ये अडचणी येऊ शकतात असे बोलण्यात येत आहे. कंगनाच्या बोलण्यामुळे ह्रतिक दुखावला असून त्याने कंगनाला चित्रपटात घेऊ नका असा काही निर्मात्यांना सल्लाही दिल्याचे सांगण्यात येते. कंगनाने ‘रास्कल’ चित्रपटाच्यावेळी अजय देवगण आणि संजय दत्तसोबत पंगा घेतला होता. त्यानंतर ती पुन्हा कधीच त्यांच्यासोबत काम करु शकलेली नाही. याची आठवण कंगनाने ठेवायला हवी असेही काही जणांना वाटते. 
 
ह्रतिकनेही आपल्या परिचयातील निर्मात्यांना कंगनाला घेऊ नका असे सांगितले असेल आणि ही गोष्ट खरी असेल तर मात्र कंगनाला फार जड जाऊ शकते. कंगनामुळे ह्रतिक किती दुखावला आहे आणि तिच्या करियरचे काय होणार?, हे आता काळच ठरवेल.
 

वेबदुनिया वर वाचा