Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॅपी बर्थ डे सोनम

हॅपी बर्थ डे सोनम

वेबदुनिया

ManojIFM
अनिल कपूर यांची कन्यका व मसक्कली गर्ल सोनम कपूरचा आज (ता.९ जून) वाढदिवस. सोनम अभिनित सांवरीया व दिल्ली ६ बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. पण सोनमच्या अभिनयाचे मात्र कौतुक होते आहे.

सोनम बॉलीवूडमध्ये स्थिरावली आहे आणि आता तिने ऐश्वर्या रायशी पंगा घेतला आहे. ऐश्वर्याने सोनमला कान्स महोत्सवात रेड कार्पेटवरून चालू दिले नव्हते. त्याबदल्यात सोनमने तिला 'आंटी' असे हाक मारणे सुरू केले आहे. ऐश्वर्या ताल चित्रपटात अनिल कपूरची नायिका होती. त्यामुळे वडिलांची नायिका म्हणजे आपली 'आंटी' असे सोनमने ठरवून टाकले. पण ती हे विसरते, की या आंटीच्या पतीची म्हणजे अभिषेक बच्चनची ती दिल्ली ६ मध्ये नायिका होती. आता ऐश्वर्या आंटी असे तर मग अभिषेक अंकल व्हायला हवा. मग सोनमने त्याची नायिका होणे कसे मान्य केले?

सध्या सोनमला घेऊन राकेश ओमप्रकाश मेहरा एक प्रेमकथा साकारत आहेत. सोनमने आता आपले लक्ष करीयवर केंद्रीत केले पाहिजे. फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi