Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘उडता पंजाब’मधील करिनाचा फर्स्टलूक

‘उडता पंजाब’मधील करिनाचा फर्स्टलूक
, शनिवार, 16 एप्रिल 2016 (11:20 IST)
आगामी ‘उडता पंजाब’ चित्रपटामधील अभिनेत्री करिना कपूरचा फर्स्टलूक प्रदर्शित करण्यात आला असून या चित्रपटात डॉक्टर शिवानी गुप्ताची भूमिका करिना कपूर साकारत आहे. पोस्टरमध्येदेखील करिना कपूरला डॉक्टरच्या गणवेशात दाखवण्यात आले आहे. नुकताच शाहिद कपूरचा फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज करण्यात आला होता. ज्यामध्ये तो ‘रॉकस्टार’च्या लूकमध्ये दिसत आहे.
 
या अगोदरही करिना कपूरने ‘क्योंकि’ आणि ‘थ्री इडियटस्’ चित्रपटांमध्ये डॉक्टरची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे पोस्टर्स पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढत आहे. चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण असणार आहे शाहिद आणि करिनाची जोडी. ब्रेकअपनंतर प्रथमच दोघे एकत्र काम करत असल्याने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अभिषेक चौबे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. शाहिद आणि करिनासोबत या चित्रपटामध्ये आलिया भट, प्रभज्योत सिंग, दिलजीत दोसांझ यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 17 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi