Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘उडता पंजाब’ मधील शाहिदचा फर्स्ट लूक रिलीज

‘उडता पंजाब’ मधील शाहिदचा फर्स्ट लूक रिलीज
, गुरूवार, 14 एप्रिल 2016 (12:36 IST)
शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्या आगामी ‘उडता पंजाब’ सिनेमातील शाहिदचा ङ्खर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हिंदी सिनेसृष्टीत पंजाबी गाण्याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारण पंजाबी भाषिकांसह इतर भाषिकांनाही गुणगुणायला लावणारे शब्द पंजाबीत आहेत. गेल्या नऊ-दहा वर्षात तर बहुतेक सिनेमांमध्ये एकतरी पंजाबी गाणं आहेच, असे दिसून येते. याच पंजाबी गाण्यावर आता एक खास सिनेमाच येऊ घातला आहे. पंजाबी गाण्यांवर आधारित या सिनेमाचं ‘उडता पंजाब’ नाव असून अभिषेक चौबेंनी दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमात बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात शाहिद कपूर पंजाबी रॉकस्टारच्या भूमिकेत असून टॉमी सिंह असं त्याचं नाव आहे. ‘जब वी मेट’ या सिनेमात शाहिद पंजाबी मुलाच्या भूमिकेत दिसला होता. पंजाबी भाषेवर शाहिदची चांगली पकडही आहे. त्यामुळे या सिनेमातील शाहिदची भूमिका पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi