Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘खुबसूरत’ केमिस्ट्री!

‘खुबसूरत’ केमिस्ट्री!
, मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (13:13 IST)
सोनम कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनित ‘खुबसूरत’ हा सिनेमा ‘वन टाईम वॉच’ मूव्ही आहे. सोनम आणि फवादची केमिस्ट्री या सिनेमात पाहाण्यासारखी आहे. जुन्या ‘खुबसूरत’ या सिनेमासोबत या सिनेमाची तुलना होऊ शकत नाही पण, दिग्दर्शक शशांक घोषनं या सिनेमाला एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. तो या प्रयत्नात बर्‍यापैकी यशस्वी झालाय, असं म्हणायलाही हरकत नाही. दिल्लीला राहणारी एक चुलबुली डॉक्टर मिली चक्रवर्ती (सोनम) व्यवसायानं सायकोथेरेपिस्ट आहे. मिलीची आई मंजू चक्रवर्तीनं (किरण खेर) मिलीचं पालन-पोषण एका बिनधास्त वातावरणात केलंय.. तिला कोणतीही रोक-टोक न करता. याच मुळे मिलीचं दोन-तीन वेळा ब्रेक अप झालंय. कारण, तिला आपल्या आयुष्यात कुणाचंही डोकावणं पसंत नाही.

सिनेमाचं कथानक पुढे सरकतं आणि एकदा मिलीला राजस्थानच्या संभलगडचा राजा शेखर राठौडच्या इलाजासाठी तिथं जावं लागतं. मिलीचा बिनधास्त अंदाज राठोड कुटुंबातील सदस्यांना एकदमच आवडून जातो.. खासकरून विक्रम राठोडला (फवाद अली खान).. विक्रम मिलीच्या प्रेमातच पडतो.. पण, इथं त्याचं कुटुंब मात्र या दोघांच्या लग्नासाठी तयार नाही. त्यामुळे, अनेक प्रयत्न करत करत मिली राठोड कुटुंबीयांचे विचार बदलते.. आणि मग या दोघांचं लग्न पार पडतं.. आता ती काय प्रयत्न करते, हे पाहणं मजेशीर आहे.
    


Share this Story:

Follow Webdunia marathi