Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘गोलमाल’ परिवाराशी जुडणार श्रद्धा कपूर

‘गोलमाल’ परिवाराशी जुडणार श्रद्धा कपूर
रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल सिरिजचा चौथा भाग असलेल्या ‘गोलमाल 4’मध्ये मुख्य भूमिकेत असणार्‍या
अजय देवगणसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार असून यापूर्वी या चित्रपटात दीपिका किंवा आलिया अजय देवगणची अभिनेत्री असणार याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली होती. 
 
पण आता ‘गोलमाल 4’ मध्ये अजय देवगणबरोबर श्रद्धा कपूर झळकणार आहे. याआधी ‘गोलमाल 3’मध्ये करिना कपूरने अजय देवगणच्या अभिनेत्रीची भूमिका केली होती. पण आता ‘गोलमाल 4’साठी दिग्दर्शक रोहित शेट्टीला तरुण अभिनेत्री हवी आहे. 
 
‘गोलमाल 4’ चे चित्रीकरण डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. ‘गोलमाल 4’मध्ये पुन्हा एकदा अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि अरशद वारसी हे अभिनेते एकत्र दिसणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक सफर चौलची