Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘जुली’च्या सि‍क्वेलला नेहा धुपियाचा नकार

‘जुली’च्या सि‍क्वेलला नेहा धुपियाचा नकार
, गुरूवार, 16 ऑक्टोबर 2014 (12:44 IST)
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिने ‘जुली’ सिनेमाच्या सिक्वेलमध्ये भूमिका करण्यास नकार दिल्याचे कळते. याबाबत बोलताना नेहा म्हणाली की, जेव्हा कोणताही दिग्दर्शक नवीन कथा बनविण्यात अपयशी ठरल्यास तो सिक्वेलचा आधार घेताना दिसतो. मी आतापर्यंत मोजून सिनेमात काम केले आहे आणि ते सिनेमे प्रचंड गाजले. भूमिका मिळविण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मला त्यात काहीही अडचण येत नसल्याचेही नेहाने म्हटले आहे. तसेच जेव्हा दिग्दर्शक माझ्याकडे सिनेमात काम करण्याची ऑफर घेऊन येतात तेव्हा मला खूप छान वाटले. परंतु सिनेमाची पटकथा आवडल्यावरच मी सिनेमासाठी होकार देते, असेही तिने म्हटले आहे. नेहा सध्या इक्कीस तोफो  की सलामी या सिनेमात काम करत आहे. या सिनेमात ती जयाप्रभाची भूमिका साकारत आहे. याशिवाय या सिनेमात घूर घूर के या गाण्यात नेहा अत्यंत बोल्ड रुपात पाहायला मिळणार आहे. या गाण्यात ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, झीनत अमान आणि हेलन यांची नक्कल करताना पाहायला मिळणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi