Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘झलक दिखला जा’ मध्ये शमिता शेट्टी?

‘झलक दिखला जा’ मध्ये शमिता शेट्टी?
, सोमवार, 4 मे 2015 (12:56 IST)
गेल्या अनेक महिन्यांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी लवकरच स्मॉल  स्क्रीनवर परतणार असल्याची चर्चा आहे. स्टार प्लस वाहिनीवर नुकताच सुरू झालेल्या झलक दिखलाजा या डान्स रिअँलिटी शोमध्ये  सहभाग घेणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी शमिता 2009 मध्ये बिग बॉसच्या तिसर्‍या सीझनमध्ये तिने भाग घेतला होता. 
 
मात्र शिल्पाच्या लग्नामुळे तिला या कार्यक्रमातून बाहेर पडावे लागले होते.
 
दरम्यान, शमिता या रिअँलिटी शोमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण शोचे निर्माते अथवा शमिताकडून करण्यात आलेले नाही. मात्र ती या शोमध्ये सहभागी झाल्यास तिच्या डान्सचा जलवा तिच्या चाहत्यांना नक्की पाहायला मिळेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi