Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘दंगल’मुळे लटकणार ‘कुंग फू योगा’!

‘दंगल’मुळे लटकणार ‘कुंग फू योगा’!
, मंगळवार, 26 मे 2015 (14:12 IST)
आगामी भारत-चीन संस्कृती दाखवणार्‍या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाच्या शूटिंगबाबत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने अडचणी असल्याचे सांगितले आहे. जॅकी चेनसोबत आमिर खान एकत्र चित्रपट करणार ही बातमी ताजी असतानाच आमिरने असे मत व्यक्त केल्यानंतर सगळेच जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत. चीनमधील प्रसिध्द निर्माता स्टॅनली टांग यांनी जॅकी चेन आणि आमिर खानला एकत्र घेऊन ‘कुंग फू योगा’ हा चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. यापूर्वी टांग यांनी जॅकीसोबत अनेक चित्रपट तयार केले आहेत. पण आमिर खानने आपल्याकडे शूटिंगसाठी वेळच नसल्याचे कारण पुढे केले आहे. जॅकी चेनसोबत काम करायला मला आवडेल, पण ‘दंगल’ या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर ते डिसेंबर या काळात होणार आहे. ‘कुंग फू योगा’ चित्रपटाचे शूटिंगही याच वर्षी सुरु करणार आहेत. पुढील वर्षापर्यंत नवा चित्रपट करण्यास आपल्याकडे वेळच नसल्याचे आमिरने स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi