Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिस्टर परफेक्शनिस्ट चक्क विवस्त्र!

मिस्टर परफेक्शनिस्ट चक्क विवस्त्र!
मुंबई , शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (13:01 IST)
बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानचा पीके येतोय हे तुम्हाला ठाऊक असेलच. नुकतेच पीकेचे पोस्टर झळकले आहे. या पोस्टरमध्ये आमिर जवळपास विवस्त्रच दिसत आहे. पोस्टर झळकताच आमिरच्या या पोजवरून सोशल नेटवर्किंग साईट्सवर चर्चेला ऊत आला आहे. 3 इडियट्‍समध्ये अमिरने विविध कल्पना माडल्या होत्या. मात्र, पीकेच्या पोस्टरमध्ये एका रेल्वे ट्रॅकवर अमिर ‍विवस्त्र उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याच्या हातात केवळ एक रेडिओ आहे.
 
पीकेमध्येही आमिरचा वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी आमिरने 3 इडियट्‍सच्या माध्यमातून समाजाला एक वेगळा मेसेज दिला होता।  
 
पीकेमध्ये आमीर ‘एलियन’ची भूमिका साकरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सिनेमात आमिरसोबत अनुष्का शर्मा आणि सुशांतसिंह रजपूत यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. हा सिनेमा 19 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi