Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘फितूर’च्या शूटिंगमध्ये कॅटरिना जखमी

‘फितूर’च्या शूटिंगमध्ये कॅटरिना जखमी
, गुरूवार, 23 एप्रिल 2015 (10:03 IST)
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ तिचा आगामी चित्रपट ‘फितूर’च्या शूटिंगवेळी जखमी झाली. कॅटरिनाला मानेला आणि पायाला जखम झाली आहे. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या शुक्रवारी दिल्लीमध्ये ‘फितूर’चे शूटिंग सुरू असताना घोडा चालविताना कॅटरिनाच्या मानेला आणि पायाला किरकोळ जखम झाली. पण दुखत जखमेसह तिने आपले शूटिंग पूर्ण केले. नंतर डायरेक्टर अभिषेक कपूरने कॅटरिनाला आराम करण्यास सांगितले.

डायरेक्टर अभिषेक कपूर यांनी याबद्दल सांगितले की, ‘कॅटरिना खूप मेहनती अभिनेत्री आहे. तिच्या प्रोफेशनलिझमबाबत ऐकले होते. पण आता अनुभवही घेतला.

‘फितूर’ मध्ये कॅटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर दिसणार आहेत. तसेच या चित्रपटात सदाबहार अभिनेत्री रेखा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi