Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘बँग बँग’चा दुसरा ट्रेलर लाँच

‘बँग बँग’चा  दुसरा ट्रेलर लाँच
, बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (12:23 IST)
हृतिक आणि कतरिनाच्या ‘बँग बँग’ या आगामी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लाँच झाला असून दिग्दर्शक सिध्दार्थ आनंद आणि फॉक्स स्टार स्टुडिओचा हा चित्रपट या आठवड्यात रिलीज होत असल्यामुळे चित्रपटाचे दोन्ही स्टारकास्ट जोमाने प्रमोशनला लागले आहेत. या ट्रेलरमध्ये अॅक्शन, रोमांच आणि हृतिक-कतरिनाशिवाय डॅनी आणि जाकिर हुसैनसुध्दा दिसत आहे.
 
चित्रपट प्रदर्शित होण्याआधी एक आठवडापूर्वी ‘बँग बँग’चा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ‘बँग बँग’च्या दुसरा ट्रेलर पहिल्या ट्रेलरच्या तुलनेत डबल डोज आहे. विशेष म्हणजे, या ट्रेलरमध्ये संवादसुध्दा आहेत. ‘बँग बँग’ २ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi