Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘बँग बँग’च्या शूटसाठी हृतिक रोशन सज्ज

‘बँग बँग’च्या शूटसाठी हृतिक रोशन सज्ज

वेबदुनिया

बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याला काही दिवस आराम घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या होत्या. महिनाभराच्या विश्रतीनंतर तो आता सिद्धार्थ आनंदच्या ‘बँग बँग’ या सिनेमाच्या शूटच्या तयारीला लागला आहे.

PR



काही दिवस शूटला सुटी द्यावी लागल्याने कॅटरिना-हृतिक या जोडीचा ‘बँग बँग’ बहुचर्चित सिनेमा आता 2 ऑक्टोबर 2014 ला रिलीज होणार आहे. 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटानंतर कॅटरिना-हृतिक पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याबाबत बोलताना अभिनेता हृतिक रोशन म्हणाला, ‘मी आता पूर्णपणे तंदुरूस्त झालो आहे. त्यामुळे लवकरच ‘बँग बँग’च्या टीमसोबत काम करण्यास सुरूवात करणार आहे. पूर्वीपेक्षा आता मला रिलीफ वाटत आहे. नव्या दमाने व उत्साहाने मी कामाची सुरूवात करीत आहे.’

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi