Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘बजरंगी भाईजान’मधील सलमानचा फर्स्ट लूक

‘बजरंगी भाईजान’मधील सलमानचा फर्स्ट लूक
, गुरूवार, 28 मे 2015 (12:46 IST)
दबंग सलमान खानच आगामी ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यातच सलमानच्या फॅन्सच्या हृदयाचे ठोके आणखी वाढले, कारण चक्क बादशाह शाहरुख खानने ‘बजरंगी भाईजान’मधील सलमानचा फर्स्ट लूक ट्विटरवर रिलीज केला आहे. या ट्विटमध्ये शाहरुखने लिहिलं आहे की माझ्या मते एक हिरोपेक्षा एक भाई असणं जास्त महत्त्वाचं आहे. शाहरुखने ट्विट केलेल्या या फोटोमध्ये सलमानने गळ्यात हनुमानाची गदा असलेलं लॉकेट घातलं आहे. मात्र यात सलमानचा चेहरा दिसत नाही. या फोटोशिवाय शाहरुखने ‘बजरंगी भाईजान’च्या रिलीजबाबतही माहिती दिली आहे. सिनेमा प्रमोट करण्यामध्ये सलमान एक्सपर्ट आहे. त्याच्या चित्रपटाचं टिटरवर प्रमोशन करण्याच्या शर्यतीत शाहरुखसह आङ्किर खानही आघाडीवर आहे. 
webdunia
आमिर खाननेही सलमानचा ‘बजरंगी भाईजान’मधील लूकचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. शाहरुख खान आणि सलमान खान बॉलिवूडच्या या दोन दिग्गज खानमधील शीतयुद्ध अनेकांना माहीत आहे. पण अनेक कारणांच्या निमित्ताने हे दोघेही एकत्र आल्याचं दिसतं. आता ‘बजरंगी भाईजान’च्या निमित्ताने बॉलिवूडचे हे करण-अजरुन एकमेकांना मदत करत असल्याचं दिसतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi