Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘बिग बॉस’मध्ये येण्यासाठी शाहरुखला आमंत्रण

‘बिग बॉस’मध्ये येण्यासाठी शाहरुखला आमंत्रण
, सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (14:20 IST)
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि बादशाह शाहरुख खान यांच्यातील वैर तर सगळेच जाणतात. त्यामुळे संधी मिळाली तर परस्परांवर तोंडसुख घेण्यास ते कधीच मागे हटत नाहीत. तसंच एकाच कार्यक्रमात एकमेकांसमोर येणंही ते टाळतात. मात्र सलमान लवकरच असं काही करणार आहे, ज्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. ‘बिग बॉस’या रिअँलिटी शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सलमानने शाहरुख खानला आमंत्रण दिलं आहे. ‘हॅप्पी न्यू इयर’चे कलाकारांनी ‘बिग बॉस’8 मध्ये सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले तर मला आवडेल, असं सलमानने म्हटलं आहे. त्यामुळे आता दोन्ही खान लवकरच एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत.‘बिग बॉस’चा आठवा सीझन कलर्स चॅनेलवर 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. तर शाहरुख खानचा अँक्शन, कॉमेडी ड्रामा असलेला ‘हॅप्पी न्यू इयर’हा सिनेमा ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, सोनू सूद, अभिषेक बच्चन आणि बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘बिग बॉस’सीझन 8 मध्ये सलमान खान एक पायलटच्या भूमिकेत दिसत आहे. मागील सीझनमध्ये सलमान सैतान आणि दूताच्या रुपात होता. या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमानला तब्बल 5 ते 6 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi