Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘मोस्टली सनी’ मधून उलगडणार रहस्ये

‘मोस्टली सनी’ मधून उलगडणार रहस्ये
पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेली सनी लिओन नेहमीच चर्चेत असते. तिने जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा नामवंत कलाकार तिच्यापासून चार हात लांबच राहात. पण आता चित्र बदलले असून बॉलिवूडचे सुपरस्टार तिच्यासोबत झळकताना दिसतात.
 
सनी लिओनवर सध्या एक डॉक्युमेंटरी बनली असून त्याची खूप चर्चा आहे. प्रसिध्द पत्रकार दिलीप मेहरा यांनी ‘मोस्टली सनी’ ही डॉक्युमेंटरी बनवली असून टोरँटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचे प्रदर्शन झाले आहे.
 
टोरँटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये आणखीनही काही फिल्मस् निवडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दीपा मेहता यांची ‘एनाटोमी ऑ.फ वायलेंस’, 16 वेळा नॅशनल अँवॉर्ड विनिंग दिग्दर्शक अडूर गोपालकृष्णन यांची ‘वन्स अगेन’, बुद्धदेब दासगुप्ता यांचा ‘द बेट’ (ढहश इरळीं), गोरान पास्काल्जेविक यांची ‘लैंड ऑ.फ द गॉड्स (देवभूमि )’, याशिवाय डॉक्युमेंटरी श्रेणीमध्ये ‘द सिनेमा ट्रैवेलर्स’, ‘इंडिया इन ए डे’, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी ‘ऐन इंसिगिक्फिकेन्ट मैन’, ए डेथ इन गंज, सोबतच ‘मोस्टली सनी’ डॉक्युमेंटरीचेही प्रदर्शन करण्यात आले. गेल्या 40 वर्षापासून टोरँटो फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. जगातील प्रतिष्ठित असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये आपला चित्रपट किंवा डॉक्युमेंटरी प्रदर्शित व्हावी अशी कलाकार आणि दिग्दर्शकांची इच्छा असते. विशेष म्हणजे सनी लिओनच्या ‘मोस्टली सनी’चा यातील सहभाग तिला विशेष आनंद देणारा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रितेशसोबत काम करणे भाग्याचे: नर्गिस