Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘व्हॉटस् अँप’ पोस्टमुळे सलमान वैतागला

‘व्हॉटस् अँप’ पोस्टमुळे सलमान वैतागला
, शुक्रवार, 10 जुलै 2015 (11:01 IST)
‘व्हॉटस् अँप’मुळे बॉलिवूडचा दबंग सलमान खान चांगलाच वैतागला आहे. व्हॉटस् अँपवर फिरणार्‍या एका मेसेजबाबत सलमानने मुंबई क्राईम ब्रँचमध्ये तक्रार दाखल केली आहे. व्हॉटस् अँपवर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमुळे सलमान चांगलाच त्रस्त झाला आहे. व्हॉटस् अँपवर त्याचा एक चेहरा फोटोशॉप करून एक आपत्तीजनक पोस्ट प्रसारित केली जात आहे अशी माहिती सलमानने पोलिसांनी दिली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉटस् अँपवर एका वृत्तवाहिनीच्या स्क्रीन शॉटवर एक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, हा फोटो खोटा असल्याचे सलमानचे म्हणणे आहे. सलमान खानचे पीआर मॅनजेरचं म्हणणं आहे की, याबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही. या तक्रारीविषयी मुंबई क्राईम बँच योग्य ती माहिती देईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi