Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारे आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दाखवली होती. 
 
लवकरच चाहत्यांना या सिनेमाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा करण जोहरने केली आहे. 
 
19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने 2012 मध्ये सर्वाधिक कमाई केली होती. ऋषी कपूर, सना सईद, रोनीत रॉय, राम कपूर आणि फरिदा जलाल यांनीही या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ सिनेमाच्या सिक्वेलची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन, यशराज फिल्मस आणि शाहरुख खानच्या रेड चिलीज यांच्या सहनिर्मितीने होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi