Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोज 40 अंडी खातो बाहुबली (Video)

रोज 40 अंडी खातो बाहुबली (Video)
आपल्या आवडत्या बाहुबलीबद्दल जाणून घ्या 10 रोचक गोष्टी:



* दक्षिण भारतीय सुपरस्टार- प्रभासने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तो साऊथचा सुपरस्टार आहे.
 
* प्रभास-राजामौळी यांची जोडी- प्रभास आणि राजामौळी यांची जोडी ब्लॉकबस्टर जोडी मानली जात आहे.
 
* 600 दिवस आणि 5 वर्षांची मेहनत- प्रभास एका वेळी एकच चित्रपट करतो. त्याने सुमारे 600 दिवस बाहुबलीची शूटिंग केली आणि या चित्रपटासाठी 5 वर्ष मेहनत घेतली.
 
* हार्ड वर्कआउट- बाहुबलीची भूमिका आपल्या आवडली पण त्यासाठी प्रभासने कडक ट्रेनिंग आणि डायट फॉलो केले. त्याने चित्रपटासाठी 22 किलो वजन वाढवले. दुहेरी भूमिका असल्यामुळे एका भूमिकेसाठी 87 किलो तर बाहुबलीच्या भूमिकेसाठी 105 किलो पर्यंत वजन वाढवले. यासाठी प्रभास ने दररोज 40 उकळलेली अंडी खाल्ली आणि मिस्टर वर्ल्ड 2010 लक्ष्मण रेड्डी यांच्याकडून ट्रेनिंग घेतली.

* वाचनाची आवड- व्यस्त असला तरी प्रभासने वाचण्याची आवड कायम ठेवली आहे. त्याच्या घरात लायब्रेरीदेखील आहे.

* क्रीडाची आवड- प्रभासला खेळण्याचाही छंद आहे. त्याने स्वत:च्या अंगणात व्हॉलीबॉल कोर्ट तयार केलेला आहे. योद्धाची भूमिका साकारायची म्हणून त्यानी या कोर्टावर आपले रिफ्लेक्स सुधारवले. ताण कमी करण्यासाठी प्रभास मित्रांबरोबर व्हॉलीबॉल खेळतो. याव्यतिरिक्त रॉक क्लाइंबिंगला तो सर्वात उत्तम ट्रेनिंग असल्याचे समजतो.
 
* लाजाळू- प्रभास स्वभावाने लाजाळू आहे आणि मीडियासमोर कमीच दिसून येतो. अजूनही तो स्वत:ला नॅशनल स्टार समजत नाही.
webdunia
* लग्नाचे ऑफर- प्रभासच्या प्रसिद्धी यावरून कळून येते की त्याला 6000 हून अधिक लग्नाचे प्रस्ताव आलेले आहेत परंतू त्याने दुर्लक्ष केले कारण त्याला बाहुबलीवर लक्ष केंद्रित करायचे होते.
 
* एकाच वेळी एकच काम- बाहुबली दरम्यान त्याने 10 कोटी रुपय्याची ऐड डील नाकारली कारण त्याला आपल्या ध्येयापासून भटकायचे नव्हते. यादरम्यान त्याने अनेक बॉलीवूडचे ऑफरही नाकारले.
 
* नेचर लव्हर- प्रभास निसर्गाला प्रेम करणारा व्यक्ती आहे आणि पक्ष्यांना पिंजर्याऐत कोंडून ठेवणे त्याला मुळीच पसंत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

AishwaryaAtCannes : कोणी म्हटले 'सिंड्रेला' तर कोणी म्हटले 'बार्बी डॉल'