पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डानं ‘उडता पंजाब’ या भारतीय सिनेमाला देशात प्रदर्शित करण्याची परवानगी दिलीय.. तेही काही अटींसह.. हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित करण्यासाठी ‘100 कट’ करण्याची ताकीद देण्यात आलीय. यामध्ये काही ‘आक्षेपार्ह आणि पाकिस्तान विरोधी’ शब्दांचाही समावेश आहे. यानंतर हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित केला जाऊ शकतो. सगळ्याच डायलॉगमध्ये शिव्यांचा वापर करण्यात आलाय.. अशावेळी पंजाबवर आधारित या सिनेमात अनेक बदल सुचवण्यात आलेत. तसंच 100 हून अधिक कट, म्युट आणि बीपचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आलाय, असं पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख मुबाशिर हसन यांनी म्हटलंय.
भारतात सेन्सॉरशिपची कात्री लागल्यामुळे हा सिनेमा चर्चेत आला होता. यासाठी सिनेमा निर्मात्यांना कोर्टाच्याही पायर्या चढाव्या लागल्या होत्या. भारतात सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या 89 दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. परंतु, शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने या सिनेमाला केवळ 2 सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले.