Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

18 नोव्हेंबरला करणार लग्न, सलमानने केली घोषणा

18 नोव्हेंबरला करणार लग्न, सलमानने केली घोषणा
बॉलीवूडचे इलिजिबल बॅचलर म्हणजे सलमान खान लग्नाच्या बेडीत अडकणार हे त्यांच्या फॅन्सने कित्येकदा ऐकलं असेल पण यावेळी सलमान गंभीर आहे.
 
29 ऑगस्ट रोजी आपल्या‍ मित्रांबरोबर वेळ घालवत होता सलमान. तिथेच सलमानने घोषणा केली की 18 नोव्हेंबरला ते लूलिया वंतूर हिच्याशी लग्न करणार आहे. ही गोष्ट मीडियापर्यंत पोहचवली सलमानच्या एक मित्राने.
कसे होईल लग्न
सूत्रांप्रमाणे सलमानचं लग्न खूप साधारण असेल. यात केवळ 15 ते 20 लोकं सामील होतील अर्थातच केवळ सलमानचं कुटुंब. नंतर वाटल्यास सलमान एक मोठी पार्टी आयोजित करून सर्व मित्रांना आमंत्रित करू शकतो.
 
18 नोव्हेंबरचा का?
या तारेखेला सलमानच्या वडिलांचे लग्न झाले होते. सलमान ही तारीख लकी मानतो म्हणून त्याने हाच दिवस निवडला. तसंही अंकशास्त्राप्रमाणे 9 हा सलमानचा लकी नंबर आहे कारण त्याची जन्मतारीख 27 आहे. आणि 18 चा जोडही 9 असतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बायकोची तब्बेत