Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फक्त 20 दिवसातच 500 कोटी क्लबमध्ये सामील '2.0', बॉक्स ऑफिसवर तोडले 2 रेकॉर्ड

फक्त 20 दिवसातच 500 कोटी क्लबमध्ये सामील '2.0', बॉक्स ऑफिसवर तोडले 2 रेकॉर्ड
भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महाग चित्रपट 2.0 ची ओपनिंग भव्य राहिली होती. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने जवळ-जवळ 20 कोटी कमावले होते. या चित्रपटाने बाहुबली भाग-1 चा रेकॉर्ड देखील मोडला आहे आणि 500 कोटींचा क्लबमध्ये ही सामील झाला आहे. एवढेच नाही तर, या वर्षी आलेल्या पद्मावत, संजू आणि थग्स ऑफ इंडियासारख्या अनेक मोठ्या बजेट चित्रपटांना देखील मागे सोडले आहे. 
 
* पहिल्या दिवशीच कमावले 100 कोटी - पहिल्याच दिवशी चित्रपटाने 100 कोटी कमावले आणि चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद बघून चित्रपट वेगवेगळ्या भाषेत रिलीज करण्यात आला. अक्षय कुमार आणि रजनीकांत पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र आले. 
 
* 500 कोटी क्लबमध्ये सामील - रजनीकांतच्या फिल्म 2.0 ला केवळ देशातच नव्हे तर परदेशातही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने जोरदार प्रदर्शन केला आहे आणि प्रेक्षकांना मनोरंजन देण्यात यशस्वी ठरला. चित्रपटाने आतापर्यंत एकूण 500 कोटीचा आकडा ओलांडला आहे. हा आकडा स्वत: मध्ये एक रेकॉर्ड आहे.
 
* अक्षयच्या करियरचा सुपरहिट चित्रपट - अक्षयसाठी हा चित्रपट खूप लकी ठरला आहे. या चित्रपटासह अक्षय एकमेव असा बॉलीवूड अभिनेता बनला आहे, ज्याच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकूण संग्रहाच्या दृष्टीने पहिल्या दिवशीच 100 कोटीचा आकडा ओलांडला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमंत्रण दिले होते का ?