Publish Date: Sat, 11 Feb 2017 (11:56 IST)
Updated Date: Sat, 11 Feb 2017 (11:58 IST)
अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे दोन कलाकार लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पुढच्या दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणा-या या चित्रपटात बॉलीवूडचे हे दोन आघाडीचे कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटातील आमिरचा लूक समोर आला आहे.
सध्या आमिरला आपल्याला पिळदार मिश्या आणि दाढीत दिसतोय. हा चित्रपट फिलीप मिडॉज टेलर याच्या कन्फेशन ऑफ अ ठग या पुरस्तकावर आधारित असून याचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करणार आहेत.