सुपरस्टार आमिर खानला हॉलीवूडमध्ये कोणतेही स्वारस्य नाही. मात्र, भविष्यात मनोरंजक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळाल्यास जरून करेन, असे आमिरने एका मुलाखतीत बोलताना सांगितले. आमिरला भविष्यात हॉलीवूडमध्ये काम करण्याविषयी प्रतिनिधींनी विचारले असता तो म्हणाला, अमेरिकेत जाऊन तेथे काम करण्यात कोणतीही रूची नाही. मी फक्त भारतीय चित्रपट करू इच्छितो. येथील प्रेक्षकांशी माझे 25-26 वर्षांपासूनचे नाते आहे. या नात्याला मी खूप महत्त्व देतो.
आमिर पुढे म्हणाला, कलेची कोणतीही सीम नसते. जर भविष्यात मनोरंजक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळाल्यास जरून करेन. वैश्विक पातळीवर लोकांचे मनोरंजन करणे चुकीचे नाही. मला जपानमधून एखादा प्रस्तवा मिळाला आणि तो प्रस्ताव चांगला असेल तर मी नक्की स्वीकारेन, असेही आमिर म्हणाला.