Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमिर खान येणार पुन्हा ACP अजय राठोडच्या भूमिकेत सरफरोश 2'ची घोषणा!

aamir khan
, रविवार, 12 मे 2024 (00:58 IST)
आमिर खानच्या सुपरहिट चित्रपट सरफरोशने नुकतीच रिलीजला 25 वर्षे पूर्ण केली आहे. यासाठी सरफरोशच्या खास स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. जिथे आमिर खान, मुकेश ऋषी, सोनाली बेंद्रे, नसीरुद्दीन शाह, मकरंद देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजेश जोशी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.यावेळी आमिर खानने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईजही दिले आहे.

'सरफरोश'च्या रिलीजला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आमिर खानने 'सरफरोश 2' बाबत मौन सोडले आहे, ज्यामुळे हा क्षण आणखीनच संस्मरणीय झाला 
 
सरफरोश'चे स्पेशल स्क्रिनिंग पीव्हीआर जुहू, मुंबई येथे झाले. या कार्यक्रमात मीडियाशी संवाद साधताना आमिर खान ने म्हटले की, माझा विश्वास आहे की 'सरफरोश 2' नक्कीच बनवायला हवा. आम्ही योग्य कथेवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि त्याचा शोध लवकरच पूर्ण होईल. तर मॅथ्यू (सरफरोश दिग्दर्शक) तुम्हाला यासाठी पुन्हा तयार राहावे लागेल, आमिर पुन्हा सरफरोशच्या एसीपी अजय राठोडच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे.

'सरफरोश' 30 एप्रिल 1999 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात आमिर खान एसीपी अजय सिंह राठोडच्या भूमिकेत दिसला होता, तर सोनाली बेंद्रे सीमाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन मॅथ्यू यांनी केले होते आणि हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. 

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'सीतारे जमीन पर'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्याचा हा आगामी चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेत्री करीना कपूरला कोर्टाची नोटीस