Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आशिकी 3 मध्ये आलिया

Alia Bhatt-Siddharth Malhotra In Mohit Suri's Aashiqui 3
चुलबुली गर्ल आलिया भट्टला अखेर तिच्या आवडीचा रोल मिळाला असल्याचे आता नक्की झाले आहे. दिग्दर्शक मोहित सुरी यांनी त्यांच्या आशिकी 3 मध्ये आलिया व सिद्धार्थ मल्होत्रा हीच जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे जाहीर केले.
म्युझिकल सीरिजमधल्या या चित्रपटात आलिया सिंगरची भूमिका करणार आहे. अशी भूमिका मिळावी अशी आलियाची खूप दिवसांची इच्छा त्यामुळे पूर्ण होत आहे. या चित्रपटाचे स्क्रिप्ट आलियाची बहीण शाहीन लिहिणार आहे.
 
आशिकी 2 मध्ये मुख्य भूमिकेत असलेली श्रद्धा कपूर हिनेही सिंगरची भूमिका केली होती. आलिया- सिद्धार्थ जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे.
 
करण जोहरच्या स्टुडंट्स ऑफ द इयर तसेच या वर्षीच्या कपूर अँड सन्समधून ही जोडी एकत्र चमकली आहेच पण पर्सनल लाईफमध्येही त्यांची केमिस्ट्री जोरात असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विजेच्या बिलमुळे आशा भोसले परेशान