Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sacred Games: कुक्कुला विचारले ट्रान्सजेंडर आहे का? तर मिळाले हे उत्तर

Sacred Games: कुक्कुला विचारले ट्रान्सजेंडर आहे का? तर मिळाले हे उत्तर
अलीकडे वेब सीरिज सेक्रेड गेम्सची चर्चा आहे. या थ्रिलर वेब सीरीजची कहाणी 80 च्या दशकातली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज या हिट सीरिजमध्ये प्रेक्षकांना "कुक्कू" ची भूमिका खूप पसंत आली आणि त्यामुळे आता "कुब्रा सैत" (कुक्कू) चर्चेत आहे. 
 
सीरिजमध्ये ट्रान्सजेंडर 'कुक्कू', नवाजुद्दीन सिद्दीकी द्वारे साकारलेली भूमिका 'गणेश गायतोंडे' चं पहिलं प्रेम होती, काही एपिसोडनंतर तिचा मृत्यू होतो. 'कुक्कू' च्या भूमिकेत असलेल्या कुब्राने लोकांचे हृद्य जिंकले आणि तिची ऍक्टींग बघून लोकांना ती खरंच ट्रान्सजेंडर आहे असे वाटत आहे.
 
आता प्रश्न हाच आहे की काय खरंच कुक्कू ट्रान्सजेंडर आहे? एका मुलाखतीत कुब्राने सांगितले की जेव्हा लोकांना हा प्रश्न पडतो तर मला कौतुक केल्यासारखं वाटतं. मी एक महिला असून मला पुरुष आवडतात. तरी मी दुनियेला हे समजण्यासाठी बाध्य केले की माझ्याकडे एक मेल पार्ट आहे. लोकं या बद्दल बोलतात तर ही माझ्या कामाची प्रशंसा आहे.
 
एका एपिसोडमध्ये कुक्कुचा न्यूड सीन आहे. एक सीनमध्ये गायतोंडे (नवाज) आणि कुक्कू (कुब्रा) यांच्यात वाद होतो. वादा झाल्यावर गायतोंडे कुक्कुजवळ येतो आणि संवादानंतर गायतोंडे, कुक्कुला तिचा प्राइव्हेट पार्ट दाखवण्याचा आग्रह करतो.
 
या सीनबद्दल बोलताना कुब्राने सांगितले की "अनुरागने माझ्याकडून हा न्यूड सीन 7 वेळा करवून घेतला. प्रत्येकदा सीन शूट झाल्यावर ते माझ्याजवळ येऊन म्हणायचे- सॉरी तुला एकदा अजून हा सीन करवा लागेल आणि मी सीन करत राहिले." ते म्हणायचे- "बघ, माझा द्वेष करू नको, मला माहीत आहे की तुझं माझ्यावर द्वेष आहे पण प्लीज असं करू नको.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाहुबलीचा अजून एक पार्ट येतोय मात्र तो नेटफ्लिक्सवर