Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अतुल कुलकर्णी आता बोल्ड भूमिकेत

अतुल कुलकर्णी आता बोल्ड भूमिकेत

दमदार भूमिकासाठी ओळखला जाणारा अतुल कुलकर्णी आता एक ‘थ्रीसम’ चित्रपटात दिसणार  आहे. हा चित्रपट बॉलिवूडचा दुसरा ‘थ्रीसम’ चित्रपट असेल. यापूर्वी २०१६ मध्ये ‘इश्क जुनून’ नामक ‘थ्रीसम’ चित्रपट आला होता.

अमोल काळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यात अतुल एका स्वतंत्र आणि खुल्या विचाराच्या चित्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक अमोलचे मानाल तर, या आगामी चित्रपटात तीन गोष्टी प्रामुख्याने असतील, त्या म्हणजे, ‘इमोशन, सेक्स आणि फायनान्स’. ‘इमोशन, सेक्स आणि फायनान्स’ या तिन्ही गोष्टींसह चित्रपट बनवण्याची कल्पना मला आवडली.अतुल पहिल्यांदा अशा सेक्युअल चित्रपटात काम करणार आहे. यात किरण थापर आणि सबा सौदागर या दोघी जणी फिमेल लीडमध्ये असतील. या दोघीही सख्ख्या बहिणींची भूमिका साकारतील. चित्रपटात  अतुल विवाहित असेल. महमूद खान नामक व्यक्तिरेखा तो यात साकारताना दिसेल, असे  त्याने सांगितले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता अनुष्का कॉमेडी चित्रपटात अजमावणार नशीब?