अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं वयाच्या 52 व्या वर्षी करोनामुळे निधन झालं. ते एक सेवानिवृत्त सेना अधिकारी होते. त्यांनी अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले आहे.
भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर बिक्रमजीत कंवरपाल यांनी 2003 मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. पेज 3, रॉकेट सिंग: सेल्समॅन ऑफ द इअर, आरक्षण, मर्डर 2, 2 स्टेट्स आणि द गाजी अटॅक यांसारख्या सिनेमांमध्ये त्याचं उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळालं आहे.
त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. करोना महामारीमुळे मनोरंजन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात झटका बसला आहे. आतापर्यंत करोना व्हायरसमुळे अनेक कलाकारांनी आपले प्राण गमावले आहेत.