Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या
, शुक्रवार, 10 जानेवारी 2025 (11:16 IST)
Bollywood news : अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिकचा जन्म 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईत चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांच्या घरी झाला.   

तसेच या अभिनेत्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहे. 2000 मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिकने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर, हृतिकने 'फिजा', 'कभी खुशी कभी गम', 'कोई मिल गया', 'क्रिश', 'जोधा अकबर', 'क्रिश 3', 'धूम 2' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'गुजारिश', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'वॉर', 'अग्निपथ', 'बँग बँग', 'सुपर 30' आणि 'फायटर' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच 20 डिसेंबर 2000 रोजी बंगळुरूमध्ये हृतिक रोशनने सुझान खानशी लग्न केले. त्यांना रेहान आणि रिधान हे दोन मुलगे आहे. पण 14 वर्षांच्या लग्नानंतर, हृतिक रोशन आणि सुझान खानचा नोव्हेंबर 2014 मध्ये घटस्फोट झाला. पण आजही ते दोघे खूप चांगले मित्र आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा हृतिक आणि सुझान त्यांच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी