rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग

Actor Sadashiv Amarapurkar's house caught fire
मुंबई- लोकप्रिय दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग लागल्याची माहिती समोर येते आहे. त्यांच्या अहमदनगर येथील घराला आग लागल्याची बातमी आहे. 
 
अहमदनगर येथे अमरापूरकर यांच्या फ्लॅटला अचानक आग लागली. ही आग इतकी वाढली की अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी उपस्थित झाल्याने मोठी हानी टळली. कर्मचाऱ्यांनी फ्लॅटमध्ये अडकलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे.
 
हा फ्लॅट सुनंदा सदाशिव अमरापुर यांच्या नावाने असून यात एक भाडेकरू राहत होत्या. ज्योती भोर पठाणे असे त्यांचे नाव असून त्या या घटनेत किरकोळ जखमी झाल्या आहेत. आग लागली तेव्हा ज्योती या फ्लॅटमध्ये अडकल्या होत्या. त्यांना अग्निशमनदलाच्या जवानांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 
 
अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटला 12 डिसेंबर रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Santosh Chordia passed away :मराठी विनोदी अभिनेता संतोष चोरडिया यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन