rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन

Actor Siddharth Shukla dies at 40
, गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (11:55 IST)
बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ फक्त 40 वर्षांचा होता. सध्या त्याचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये असून पंचनामा केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, औषध घेतल्यानंतर तो काल रात्री झोपला आणि सकाळी उठला नाही. सिद्धार्थ शुक्ला टीव्हीचे सुप्रसिद्ध नाव होते आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय होता.
 
वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली.
 
सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच व्यवसाय करायचा होता. तो त्याच्या लुक्समुळे लोकांना आकर्षित करायचा. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ येथे पोहोचला. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नसीरुद्दीन शाहांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा विजय साजरा करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना चांगलेच सुनावलं