Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री ऐश्वर्या राय ला सिन्नरच्या तहसिलदारांनी बजावली नोटीस!

aishwarya rai
, मंगळवार, 17 जानेवारी 2023 (15:03 IST)
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सिन्नरमधील जमिनीचा कर थकवल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून सिन्नरच्या तहसीलदारांनी थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी 1200 मालमत्ताधारकांना  तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. त्यात ऐश्वर्या राय-बच्चनला देखील ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे नाशकात ऐश्वर्या रायचे नाव नव्याने चर्चेत आले आहे.
 
याबाबत अधिकची वृत्त असे की, ऐश्वर्या यांची सिन्नरच्या ठणगाव जवळ आडवाडीत जमीन आहे. या भागात ऐश्वर्याची आडवाडीच्या डोंगराळ भागात सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन असून या जमिनीचा कर थकला आहे. याच जमिनीच्या एका वर्षाच्या कराचे 22 हजार थकल्याने नोटीस बजावण्यात आली आहे.
 
ऐश्वर्या राय सोबत इतरही 1200 मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली असून हा आकडा मोठा आहे. थकीत अकृषक कराचा भरणा मोठ्या प्रमाणावर रखडला आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. त्यातूनच 1200 मालमत्ताधारकांना  तहसीलदारांनी नोटीस बजावली असून वसुली मोहीम राबवण्यात येत आहे.
 
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या 1200 मालमत्ताधारकांमध्ये ऐश्वर्या राय सोबतच अनेक मोठी नवे आहेत. त्यात बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रायव्हेड लिमिडेट, मेटकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिडेट, छोटाभाई जेठाभाई पटेल अँड कंपनी, राजस्थान गम प्रायव्हेट लिमिटेड, एल. बी. कुंजीर इंजीनिअर, आयटीसी मराठा लिमिटेड, एस. के. शिवराज, हॉटले लीला व्हेंचर लिमिटेड, कुकरेजा डेव्हलपेंट कॉर्पोरेशन, रामा हँडिक्राफ्ट, ओपी एंटरप्रायझेस कंपनी गुजरात यांचा देखील समावेश आहे.
 
 
Edited By - Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Farzi: फर्जीचा ट्रेलर रिलीज, शाहिद कपूर एक्शन मध्ये