सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरू आहे तर दुसरीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच याविषयी नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढालादेखील बॉयकॉट करण्यात आले होते. सध्या बॉयकॉट हा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्रेंडवर बॉलिवूडमधील कलाकार आपापली मतं व्यक्त करत आहेत.
अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी बॉयकॉट बाबतीत आपले मत मांडले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, काहीही झाले तरी चित्रपट बनणार नाहीत अशी परिस्थिती नाही. जोपर्यंत चित्रपट बनत आहेत तोपर्यंत लोकांना मोबदला मिळेल. अर्थातच, पुन्हा एक साथीचा रोग आला तर सर्व काही ठप्प होईल. तुम्ही चित्रपटसृष्टीला कुलुपात बंद करू शकत नाही. हा अतिशय युटोपियन विचार आहे. असे कधी झाले नाही आणि होणारदेखील नाही.