Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री राखी सावंतने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला, नाव बदलले

rakhi sawant
, शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (16:32 IST)
बॉलीवूडची वादग्रस्त व्यक्तिमत्त्व राखी सावंतने तिचा दीर्घकाळचा प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत कोर्ट वेडिंग केलं होतं. 11 जानेवारी रोजी त्यांच्या खाजगी विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाल्यानंतर या जोडप्याच्या लग्नाची बातमी त्वरीत पसरली.
 
राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्या कथित गुप्त कोर्ट मॅरेजचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता राखी सावंतनेही लग्नाच्या प्रकरणाला दुजोरा दिला आहे आणि सांगितले की, दोघांनी 2022 मध्ये लग्न केले. राखी सावंतनेही लग्नानंतर इस्लामचा स्वीकार केला आहे.
 
राखी सावंतने दीर्घकाळचा प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत लग्न करून  तिचे नावही बदलले आहे. विशेष विवाह प्रमाणपत्रानुसार राखी आता राखी सावंत फातिमा आहे. मात्र, 11 जानेवारीपूर्वी राखीचा आदिल खानसोबत नववधूच्या वेषात असलेला एक फोटो व्हायरल झाला होता.
 
राखीचे यापूर्वी रितेशसोबत लग्न झाले होते आणि दोघेही सलमान खानच्या बिग बॉस 15 मध्ये एकत्र दिसले होते. शो संपल्यानंतर लगेचच दोघांचे नाते संपुष्ठात आले. 

Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आलिया-रणबीरच्या मुलीची झलक