लग्नानंतर नाव बदलणार प्रियांका?

शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (09:09 IST)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा मित्र निक जोनस आपल्या लग्नाची जोरदार तयारी करत आहेत. लग्नासाठी राजस्थानधील उमेद भवन पॅलेस बुक करण्यात आले आहे. 2 डिसेंबरला हे रॉयल वेडिंग पार पडणार आहे. प्रियांका सध्या तिचा चित्रपट 'स्काय इज पिंक'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवर तिने एक शानदार पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये  'देसी गर्ल' प्रियांका चोप्राच्या नव्या नावाचे हिंट समोर आले. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नानंतर प्रियांका आपलं नाव बदलू शकते. प्रियांका निक जोनस असे तिचे नाव होऊ शकते, असे म्हटले जात आहे. या पार्टीत प्रियांका आणि निक खूपच रोँटिक अंदाजात दिसत होते. पार्टीचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पार्टीमध्ये निक जोनस, प्रियांकाचा भाऊ आणि सोनाली बोस, सिद्धार्थ राय कपूरदेखील उपस्थित होते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस 2 डिसेंबर रोजी जोधपूरमध्ये विवाहबध्द होणार आहेत. 30 नोव्हेंबरपासून लग्नाची तयारी सुरु केली जाणार आहे. 3 डिसेंबरपर्यंत सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख 2.0 review: चित्रपट परीक्षण