Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

ऐश्‍वर्याचा चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास नकार?

aishwarya and chiranjeevi
, शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017 (16:38 IST)
ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे. मात्र पुनरागमनानंतरही ऐश्‍वर्या फारशी कमाल दाखवू शकलेली नाही. चित्रपटांच्या निवडीबाबत अत्यंत चोखंदळ झालेल्या ऐश्‍वर्याने स्मार्ट पद्धतीने चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे. दक्षिणेतील मेगास्टार चिरंजीवीसोबत “नरसिंहा रेड्डी’ या चित्रपटात भूमिका करण्यास ऐश्‍वर्याने नकार दिला. मुळात ऐश्‍वर्याने थेट नकार देण्याऐवजी आपल्या मानधनाचा आकडा प्रचंड वाढवून मागितला. तसे केल्याने झाकली मूठ राहत असल्याचा ऍशचा समज असला तरी तिचे सत्य उघड झाले आहेत.
 
ऐश्‍वर्याने कमबॅकनंतर फक्त तरुण अभिनेत्यांसोबत चित्रपट करण्यास पसंती दिली आहे. ऐश्‍वर्याने आतापर्यंत समकालीन किंवा वयस्क अभिनेत्यांसोबत भूमिका केल्या आहेत. अगदी अलिकडेच ऐश्‍वर्या रायबरोबर आर. माधवन हा “फन्ने खान’मध्ये रोमॅंटिक भूमिका करणार असल्याचे समजले होते. मात्र माधवनने केलेल्या काही भन्नाट मागणीमुळे त्याच्या ऐवजी राजकुमार रावला घेण्यात आल्याचे अगदी अलिकडेच समजले आहे. ऐश्‍वर्या राय बच्चनच्या बरोबर राजकुमार राव….! कशी वाटते ही जोडी.
 
पण असो. माधवनने हा सिनेमा नक्की का सोडला या मागेही काही कारण आहे. तारखा जुळल्या नाहीत, असे स्पष्टिकरण माधवनकडून दिले गेले आहे. मात्र ते खरे कारण नाही, हे उघड आहे. माधवनने ऐश्‍वर्या रायबरोबरच्या या चित्रपटासाठी भरमसाठ मानधन मागितले होते. 15 दिवसांच्या शुटिंगसाठी त्याने 1.5 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र “फन्ने खान’च्या निर्मात्यांचे बजेट अगदीच जेमतेम असल्याने त्यांना माधवनच्या मागणीचा विचारही करणे शक्‍य झाले नाही.
 
आता ऐश्‍वर्याच्या बरोबर कोणत्या हिरोला उभे करायचे यासाठी चक्क ऑडिशन्स घेण्याची वेळ आली. त्यासाठी अक्षय ओबेरॉय, कार्तिक आर्यन आदींच्या ऑडिशन्स डायरेक्‍टर मुकेश छाब्रा यांनी घेतल्या. पण काही समिकरण जुळेना. मल्याळम सिनेमातल्या आदिल इब्राहिमसाठीही प्रयत्न झाले. मात्र ऐश्‍वर्याने त्याच्याबरोबर काम करण्यास नकार दिला. अखेर तिने राजकुमार राव बरोबर काम करायला होकार दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मामा' ला इंग्रजीत काय म्हणतात?