rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत

akshay kumar
, गुरूवार, 19 एप्रिल 2018 (16:05 IST)

अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. या अपघातानंतर अक्षयला डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी अक्षयला मुंबईला परतण्याचा सल्ला दिला होता मात्र अक्षयने त्यासाठी नकार देत कामाला प्राधान्य दिले आहे.

केसरी या चित्रपटाचे शूटींग सध्या साताऱ्यातील वाई येथे सुरू आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्ससाठी एक स्टंट करत असताना अक्षय कुमार जोरात जमिनीवर आदळला. त्यामुळे त्याच्या छातीला व बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्यानंतर सेटवरील डॉक्टरांनी अक्षयला आराम करण्याचा सल्ला दिला. दिग्दर्शकांने अक्षयला मुंबईला जाण्यास सांगितले. त्यासाठी  अक्षयचे हेलिकॉप्टर देखील तयार ठेवण्यात आले होते. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना!