Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअरपोर्टवर अक्षय कुमारच्या मुलाला थांबवलं

webdunia
, शनिवार, 7 जानेवारी 2023 (07:46 IST)
अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आरव सध्या यूकेमध्ये शिकत आहे. या व्हिडिओमध्ये आरव कारमधून खाली उतरताना आणि जॅकेट हातात घेऊन विमानतळाच्या आत जाताना दिसत आहे. सहसा स्टार्स आणि स्टार किड्सना एंट्री गेटवर एवढी वाट पहावी लागत नाही आणि व्हीआयपी एंट्री लागेच मिळते, मात्र आरवच्या बाबतीत असे घडले नाही. सिक्युरिटीने आरवला गेटवर थांबवले आणि कागदपत्रे दाखवण्यास सांगितले.
 
आरवला गेटवर थांबवताच त्याच्यासोबत असलेले कर्मचारी लगेचच त्याला कागदपत्रे दाखवण्यासाठी सुरक्षारक्षकासमोर पोहोचले. यादरम्यान चेकिंगसाठी बराच वेळ थांबावे लागले आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याला आत एंट्री दिली गेली नाही, नेटकऱ्यांमध्ये घडलेल्या प्रकराची खूप चर्चा आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझ्या हातात बेड्या पाहायच्या होत्या, बरोबर? तुमची इच्छा पूर्ण झाली-उर्फी जावेद