Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षयने केली मानधनात मोठी वाढ, इतके आहे मानधन

webdunia
बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारचे एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता अक्षयने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटासाठी अक्षयने त्याच्या मानधनात वाढ केली असल्याचे देखील म्हटले जात आहे. ‘बॉलिवूड हंगाम’ने दिलेल्या रिपोर्टनुसार अक्षय कुमार वासु भगनानी आणि ‘एअरलिफ्ट’ चित्रपटाचा दिग्दर्शक निखिल आडवाणीसोबत एक पॉवर पॅक चित्रपट करणार असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात अॅक्शन, इमोशन आणि मनोरंजनाचा मारा करण्यात येणार आहे. हा चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित असल्याच्या देखील चर्चा आहेत.
 
अक्षयचा आगामी चित्रपट बिग बजेट फिल्म असणार असून त्याचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात येणार आहे. अक्षयने चित्रपटासाठी होकार दिला असला तरी तिने १०० कोटी रुपये मानधन मागितले असल्याचे म्हटले जात आहे. अक्षयने मागितलेल्या एकूण मानधनावरुन तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

हॉलिवूडच्या सुपरमॅनचे निधन