बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गुरुवारी, १४ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. सोशल मीडियावर अभिनंदनाचा ओघ सुरू झाला आहे. जेव्हापासून त्यांच्या लग्नाची बातमी अधिकृतपणे समोर आली तेव्हापासून मिस्टर आणि मिसेस कपूर सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले.
लोक वेगवेगळे फोटो शेअर करून रणबीर आणि आलियाचे अभिनंदन करत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटातील आलिया आणि रणबीरचा फोटो शेअर करताना एका यूजरने लिहिले, "अभिनंदन मिस्टर आणि मिसेस कपूर.
एका चाहत्याने ट्विटरवर आलिया आणि रणबीरचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "आता ते अधिकृतपणे मिस्टर आणि मिसेस कपूर आहेत". यासोबतच आलियाने रणबीर वेडिंगचा टॅगही वापरला आहे.