Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अलका याग्निक बनल्या वायरल अटॅकच्या श‍िकार

अलका याग्निक बनल्या वायरल अटॅकच्या श‍िकार
, मंगळवार, 18 जून 2024 (12:02 IST)
90s मध्ये बॉलीवूडला अनेक प्रसिद्ध आणि आयकॉनिक गाण्यांना आवाज देणारी सिंगर अलका याग्निक यांना एक रेयर न्यूरो समस्या झाली आहे. अलका याग्निक यांनी सोशल मीडियावर सांगितले की त्यांना ऐकू येत नाही. 
 
अलका यांनी सांगितले की, त्यांना एक वायरल अटॅक समस्या झाली आहे. त्या फ्लाईटमधून बाहेर येतांना त्यांना ही जाणीव झाली की, त्यांना ऐकू येत नाही आहे. अलक यांनी आपल्या समस्येची माहिती देत  चाहत्यांना आणि कलाकारांना हा सल्ला दिला की, लाऊड म्युजिक पासून दूर राहा. 
 
अलका यांनी शेयर केली आपबिती-
अलका यांनी सांगितले की, काही आठवड्यांपूर्वी मी जेव्हा विमानामधून बाहेर पडली. तर मला जाणवले की मला ऐकू येत नाही आहे.  तसेच अलका यांनी सांगितले की, माझ्या डॉक्टर्स ने याला एक रेयर सेंसरी नर्व हियरिंग लॉस डायग्नोज केले आहे, जो एक वायरल अटॅक मुळे झाला आहे. या अचानक झालेल्या मोठ्या सेटबॅक ने मला धक्का बसला आहे. मी त्याला स्वीकार करण्याचा प्रयत्न करीत आहे. यादरम्यान तुम्ही मला तुमच्या प्रार्थनेमध्ये ठेवा. 
 
अलका फक्त बॉलीवुड नाही तर, पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध सिंगर्स पैकी एक आहे. 25 पेक्षा जास्त भाषांमध्ये 21 हजार पेक्षा जास्त गाणे रेकॉर्ड केलेल्या अलका याग्निक यांनी दोन वेळेस नॅशनल अवॊर्ड देखील जिंकले आहे. 2022 मध्ये गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स ने त्यांना जगभरामध्ये सर्वात जास्त स्ट्रीम केल्या जाणाऱ्या आर्टिस् मानले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pushpa 2 Release Date: पुष्पा 2: द रुल' ची रिलीज डेट जाहीर