Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फॅमिली मॅन २ चा टीझर प्रदर्शित

webdunia
सोमवार, 2 डिसेंबर 2019 (10:33 IST)
अभिनेता मनोज वाजपेयीने ‘द फॅमिली मॅन’ या अॅमेझॉन प्राईमवरील वेबसिरीजमध्मये काम केले. आता  या वेबसिरीजची लोकप्रियता पाहता या वेबसिरीजचा दुसरा सिझन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
पहिल्या सिझनची लोकप्रियता पाहता दुसऱ्या सीझनमध्ये तीच स्टार कास्ट असणार आहे. पुन्हा एकदा मनोज वाजपेयी आपल्या जून्या श्रीकांत तिवारीच्या भुमिकेत दिसणार आहे. पण आधीच्या भागापेक्षा आणखी दमदार श्रीकांत तिवारी दिसणार आहे. 
 
द फॅमिली मॅनचे निर्माता,लेखक आणि दिग्दर्शक राज निदिमोरू आणि कृष्णा डीके आहेत. सोबतच तामीळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपस्टार अभिनेत्री  समंथा द फॅमिली मॅन २ मधून वेबसिरीजच्या दुनीयेत प्रवेश करत आहे. अद्याप ही वेबसिरीज कधी रिलीज होईल हे गुलदस्त्यात आहे. समंथाने इन्स्टाग्रामवर फॅमिली मॅन २ चा टीझर शेअर केला आहे. #TheFamilyMan #TheFamilyMan2 Yasssssssss finallyyyyyyy…. my web series debut with the most kickass show … ?? @rajanddk my heroes ???? Thankyou for giving me a dream role.” असं कॅप्शन तीने दिलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

मराठी अभिनेत्री सारा श्रवणला अटक, खंडणीचा आहे आरोप, अटकपूर्व जामीनही फेटाळला